आपले आई वडील जेव्हा आपल्यासोबत नसतात तेव्हा आयुष्य जगणे फार कठीण होते मग कल्पना करा जर तुम्ही फक्त दहा वर्षांचे मूल असाल आणि तुमची देखभाल करण्यास मागे व पुढे कोणी नसेल तर आयुष्य नक्कीच सोपे नसते आपल्यासाठी आई वडील शिवाय १० वर्षाचा मूलगा कसे एकटे जगू शकतो असा विचार करणेच खूप अवघड आहे पण आज अशाच मुलाबद्दल जाणून घेणार आहोत.ही कहाणी ऐकून तुमचे डोळे नक्कीच ओलसर होतील पण त्याच वेळी तुम्हाला या मुलाकडून बरीच प्रेरणा सुद्धा मिळेल.

हा आहे १० वर्षीय डांग वान खुयेन वियतनामी गावात राहणारा डांग आपल्या घरात एकटाच राहत नसून तर तो शेतात मेहनतही करतो. डांगने त्याच्या आयुष्यात बरेच दुःख भोगलेे आहे त्याची आई तो अगदी लहान वयातच त्याला सोडुन गेली यानंतर वडिल कामाच्या शोधात शहरात गेले त्या काळात डांगचे आजी त्याची काळजी घेत असत वडील जेव्हा शहरात जाऊन पैसे कमवत असे तेव्हा ते आपले घर चालवत असत. काहीवेळा आजी गावात स्वयंपाकाचे काम करून थोडे फार पैसे कमावत असे.दहा वर्षाचा मुलगामग एक दिवस डांगच्या वडिलांचाही अपघातात मृ’त्यू झाला गावातील लोकांनी दान देऊन त्याच्या वडिलांचे पार्थिव गावात आणले. यानंतर थोड्या वेळाने डांगच्या आजीला हा ध’क्का सहन झाला नाही आता डांग घरात एकटा असतो.आता तो घराजवळील शेतात रोज काम करतो येथे तो स्वत: साठी भाज्या उगवितो शेजारी त्याला अन्न देऊन मदत करतात. तसेच डांगचे घर लाकडापासून बनविले असून ते देखील कमकुवत होत आहे या घरात जोरदार वारा वाहत असतो. डांगला मदत करायला खूप जण पुढे आले बऱ्याच लोकांनी त्याला दत्तक घेण्याची ऑफर दिली पण डांगने या सर्वाना स्पष्ट नकार दिला आपण स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहे असे डांग ने सांगीतले.शेजार्‍यांनीही डांगला सल्ला दिला की तोे एकटा घरी न राहता आमच्याबरोबर राहावे पण डांगला एकटे राहायला आवडते. एक मजेशीर गोष्ट म्हणजे डांग शेतात इतके काम करूनही तो रोज शाळेत जातो तो कधीही त्याची शाळा चुकवत नाही.दहा वर्षाचा मुलगात्याचा विडीओ बनवून त्याच्या शिक्षकाने ऑनलाइन शेअर केला तेव्हा अनेकांनी त्याला दत्तक घेण्याची इच्छा दर्शवली अनेकांनी त्याला मदत करण्याचे ठरविले. अनेकांनी त्याची कथा ऐकूण- पाहून राहवले नाही. पण एवढ्या लहान वयात त्याच्यावर आलेले संकट आणि त्या संकटावर त्याची मात हि आपल्या सर्वांसाठी प्रेरणा दायक ठरते शेवटी यालाच जीवन असे म्हणतात. मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.