मिथुन-
१५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२०
घरातील भांडणे घरातच ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवने सध्या फार महत्वाचे आहे. प्रवासात काही अनपेक्षित गोष्टींमुळे त्रास संभवतो. जमीन जुमल्याची कामे पुढे ढकला. कर्ज काढू नका तसेच कुणाला जामीनही राहू नका.
हा आठवडा तसा जेमतेम जाणार आहे. विशेष काही घडणार नाहीये. सुरुवात सामान्य आहे. विविध योजना बनविण्याची अपेक्षा आहे. पण चालू काम पहिले पूर्न करा. जुने अडकलेले काम नातेवाईकांमुळे पूर्ण होईल. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. स्थलांतर करण्याची वेळ आपणास येईल.
नोकरीत पदोन्नती होण्याचे योग आहेत. ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे. त्याने धोका दिल्याने आपणास त्रास होईल. बेरोजगार व्यक्तींना नोकरीची संधी मिळेल.
शुभ तारीख-१७,१९,२१

कर्क –
१५फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी २०२०
‘भित्र्या पाठी ब्रम्हराक्षस’ हि म्हण तुम्ही जाणताच, आलेल्या समस्यांना धैर्याने सामोरे जा. उत्पादनापेक्षा खर्च अधिक होणार नाही हे पहा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. हातून एखादे शुभ कार्य घडेल. या आठवड्यात नाती लाभदायक ठरतील. पण आपल्या कठोर परिश्रमाचे चीज होईल. व्यवसायानिमित्त यात्रा सफल होतील. धार्मिक तसेच मंगल कार्यामध्ये रममाण व्हाल. कलाकारांना सन्मान मिळेल तसेच आर्थिक लाभ होतील. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कर्ज देण्याघेण्यामध्ये अडथळे निर्माण होतील. या आठवड्यात या राशीच्या लोकांनी दानधर्म करावा. भुकेलेल्या खाऊ घालावे म्हणजे आपल्या पदरात पुण्य पडेल.
शुभ तारीख-१६,१७,१९
ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले

टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.