फिल्म इंडस्ट्रीमध्ये एका पेक्षा एक मोठे स्टार आहेत एका मुलाखती दरम्यान दक्षिणेतील एका अभिनेत्याने सांगितले की मी शाहरुख, सलमान नव्हे तर या सुपरस्टारने प्रभावित झालो आहे. या आज आम्ही तुम्हाला सांगतो की तो अभिनेता कोण आहे. प्रभास- बाहुबली प्रभास हा दक्षिणेचा एक अतिशय सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टार आहे. बाहुबली चित्रपटानंतर प्रभासला इतकी लोकप्रियता मिळाली की आज त्याला संपूर्ण भारतभर पंसत केले जाते आणी त्याचे जगभरात चाहते आहेत त्याचा बाहुबली चित्रपट हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
प्रभासच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या साहो या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे प्रभासचा साहो हा भारतातील सर्वात मोठा अॅक्शन चित्रपट आहे हा ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचेही सिद्ध झाले आहे हा चित्रपट 30 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता त्यांच्या साहो चित्रपटानंतर फिल्मबिटने त्यांची भेट घेतली. त्यांनी एका मुलाखतीत त्याला विचारले की ट्रेलर लॉन्च दरम्यान तुमची तुलना सलमान खानच्या स्टारडमशी केली जाते का तुम्हाला काय वाटते.
प्रभास उत्तर देताना म्हणाले की सलमान खान जेथे आहेत तिथे त्याच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही. ते म्हणाले की सलमान खान यांनी अनेक कलाकारांना चित्रपटसृष्टीत आणले आहे ते बर्याच दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आहेत आणि ते लाखो लोकांना प्रेरणा देत आहेत पुढे बोलताना ते म्हणाले की आतापासून 50 वर्षानंतर देखील ते जेव्हा चित्रपटसृष्टीत नसतील तरीही ते प्रत्येकाच्या हृदयात राहतील आणि प्रत्येकासाठी प्रेरणा असतील.
यानंतर प्रभास यांना विचारले गेले की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुमच्यावर कोणत्या अभिनेत्याचा प्रभाव आहे त्यावेळी प्रभास म्हणाले की मी आमिर खानशी खूप प्रभावित आहे. त्यांचा लगान आणि दिल चाहता है हे दोन्ही चित्रपट एकाच वर्षात प्रदर्शित झाले होते. कोणत्याही अभिनेत्यासाठी दोन पूर्णपणे वेगवेगळे भुमिका असलेले चित्रपट करणे हे एक मोठे आव्हान आहे.
आमिर खान यांनी आपल्या दोन्ही चित्रपटांची व्यक्तिरेखा अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे. ते म्हणाले की मला आमीर खान यांचे चित्रपट खूप आवडतात ते म्हणाले की कमल हसन सर अॅक्शन चित्रपटही करतात प्रभास म्हणाले की मी याच कलाकारांकडून शिकतो. मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.