अमिताभ बच्चन

ज्या काळी भारतीय फिल्म इंडस्ट्री च्या अभिनेत्री साडी आणि सूट वर असत त्या काळी भारतीय फिल्म इंडस्ट्री ची इमेज बोल्ड आणि ग्लॅमर मध्ये बदलली अशी अभिनेत्री परवीन बाबी जिचे दुनियभरचे चाहते होते. परवीन बाबी ने 1973 साली चरित्र या चित्रपटातुन आपल्या फिल्मी करियर ला सुरुवात केली त्यानंतर दिवार अमर अकबर अँथनी काला पत्थर, सुहाग काली कांती या चित्रपटातून आपली अलग छबी तयार केली. परवीन बाबी च्या डान्स आणि बोल्ड सिन ने लोक तिचे दिवाने झाले. टाइम मॅक्सिन च्या फ्रँटपेज वर स्थान मिळवणारी परवीन बाबी बॉलीवूड ची पहिलीच हस्ती होती.

परंतु परवीन बाबी जीवनभर प्रेमासाठी तरसात राहिली प्रेमात तिला धोकेच मिळाले म्हणून तिने 1983 अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे इंटेरिअर डिझायनर चे काम चालू केले परंतु तिथे परवीन बाबी पॅरानोईड स्किझोफ्रेनिया ह्या मानसिक रोगाची शिकार झाली ह्या बिमारीमध्ये मरीज वास्तविक जीवणापेक्षा वेगळ्या जीवनात जगात असतो.

6 वर्षानंतर 1989 मध्ये परवीन बाबी जेव्हा भारतात वापस आली तेव्हा तिने अमिताभ बच्चन आरोप वर आरोप लावले. तिने कोर्टामध्ये अमिताभ बच्चन वर केस पण केली की अमिताभ बच्चन मला मारून टाकेल. पण कोर्ट ने पुरावा मागितला पण पुरावा काहीच नव्हता कारण परवीन बाबी मानसिक रोगाने ग्रस्त होती. तिने एका मॅगझीन च्या मुलाखतीत तिने सांगितले होते की “अमिताभ बच्चन एक मोठा गँगस्टर आहे आणि त्यांच्या गुंडाने मला सुनसान जागेमध्ये ठेऊन तिथे माझ्या कानामागे ऑपरेशन करून ट्रान्समिटर लावलं होतं.” परवीन बाबी ला हमेशा वाटत असे की तिचा कोणी मर्डर करेल ह्या भीतीने ती दुसऱ्याशी भेटायला येणाऱ्याशी दूर राहत असे. हर गोष्टीच ती रेकॉर्डिंग करत असे. टेलिफोन वर पण म्हणत असे “आपला फोन सर्विलान्स वर आहे बोलताना विचारपूर्वक बोला.” आज पण तिचे सर्व रेकॉर्डिंग महाराष्ट्र सरकारने सुरक्षित ठेवले आहे.

परवीन बाबी च्या जीवनात अमिताभ बच्चन कबीर बेदी, आणि महेश भट्ट या 3 लोकांनी तिच्या मनात घर केले परंतु ते घर पूर्ण होऊ शकले नाही. महेश भट्ट ने तर तिच्या साठी आपल्या बायकोला घटस्फोट दिला होता पण परवीन बाबीच्या मानसिक आजारामुळे त्यांनी लग्न केलं नाही.

परवीन बाबी ला परोनॉइड स्किझोफ्रेनिया सोबतच पायाचा गँगरिण रोग होता यातच तिचा 22 जानेवारी गूढ मृत्यू झाला. दोन दिवसांपासून दुधाचे पुडे आणि वृत्तपत्र तिच्या घराबाहेर तशेच होते 22 जानेवारी 2005 ला घराभोवती घाण वास येऊ लागल्याने पोलीस मृतदेह ताब्यात घेतले त्यावेळेस तिचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी च झाला होता.