नमस्कार मित्रांनो सुमारे 67500 किमी लांबीच्या रेल्वे नेटवर्कच्या बाबतीत आपला भारत देशाचा जगात चौथ्या क्रमांक लागतो. राजधानी जनशताब्दी वंदे भारत हमसफर अशा काही गाड्या सोडल्या तर भारतातील बहुतेक गाड्या निळ्या रंगाच्या असल्याचे आपल्याला दिसून येते. आपण जेव्हा ट्रेनने प्रवास करतो तेव्हा आपल्या मनात कधीतरी हा प्रश्न नक्कीच उद्भवला असेल की ट्रेनचा रंग निळा का आहे. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत भारतातील ट्रेनचा रंग निळा का आहे.रेल्वेमित्रांनो 1990 च्या पुर्वी गाड्या लाल रंगाच्या होत्या आणि या गाड्यांमध्ये ब्रेकसाठी व्हॅक्यूम ब्रेकिंग सिस्टम वापरत असत ब्रिटीश काळापासून गाड्यांमध्ये हा ब्रेक घेत असत ब्रेक तितका प्रभावी नव्हता आणि ब्रेक ही लवकर लागत नव्हता. एअर ब्रेकिंग सिस्टम आल्यानंतर या ब्रेकिंग सिस्टममुळे गाड्यांना वेगाने ब्रेक लावता आला.

म्हणूनच हळूहळू भारतातील सर्व ट्रेनमध्ये एअर ब्रेकिंग सिस्टम सुरू केली गेली परंतु सर्व गाड्यांचा लाल रंग असल्यामुळे कोणत्या गाडीत कोणती ब्रेकिंग सिस्टम वापरली जाते हे समजणे कठीण होते.त्यामुळे एअर ब्रेकिंग सिस्टम असलेले डबे निळे करण्यात आले.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.