कर्क -१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२० तुमच्या अंगी असलेल्या कर्तृत्वगुणांना वाव मिळण्याचा काळ आहे. आर्थिक नियोजनास प्राधान्य द्या. तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले तर बरेच गैरसमज आणि नुकसान टाळू शकलं. प्रवासात थोडा त्रास संभवतो. या राशीचे व्यवसायिक आपले काम अतिशय कष्ट करून पूर्ण करतात. पण सध्या ग्रहमान चांगले असल्याने कार्ये त्वरेने पूर्ण होतील. बांधकाम करणाऱ्यांचे काम मात्र अर्धवट स्थितीतच राहील. वकिलांना नवीन ओळखी, नाती यामुळे फायदा संभवतो. जुनी येणी वसूल होतील.सिनेमा निर्माते, कलाकार याना चिंतन लाभदायक ठरेल. नोकरदारानी व धनिकांनी शंकराची उपासना करावी, म्हणजे कोर्ट कचेऱ्यांची कामे होतील. मध्यमवर्गीयांना स्वतःचे घर बांधण्याचा योग आहे. बेकारांनि इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. शुभ तारीख- २१,२३,२४

मिथुन -१९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२० मिळणाऱ्या यशाने हुरवळून न जाता पुढचा कार्यभाग साधा. समाजात आपल्या शब्दाला मिळणारा मान हा आपली प्रतिष्ठा वाढविणारा ठरेल. ज्येष्ठांच्या कृपाशीर्वादाने यशस्वी व्हाल. या आठवड्यात प्रवास संभवतो. राजकारणात आपले वर्चस्व राहील. कोणत्याही आमिषाला बळी पडून चुकीचे काम करू नका. आपल्या सहकार्यामुळे कोणाचे तरी अडलेले काम होईल. प्रेम प्रकरणामध्ये उत्साह राहील. तसेच प्रेम विवाह, प्रेमप्रकरणाच्या बाबतीत तणावाची स्थिती निर्माण होईल. धार्मिक प्रसंग आपणास अनुकूल आहेत. शुभ तारीख-२०,२३,२५

टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद. ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले