श्रीलंकेतील सुंदरी जॅकलिन फर्नांडिस हिचा जन्म १९८५ मध्ये मनमा बहरीन येथे झाला होता तिचे वडील श्रीलंकन ​​तमिळ आणि आई मलेशियन आहे काही चित्रपटांमध्ये काम करून जॅकलिन बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री बनली आहे जॅकलिन शेवटच्या वेळी ड्राईव्ह या चित्रपटात दिसली होती ज्यात तिचा नायक सुशांत सिंग राजपूत होता तिच्या सिनेमांव्यतिरिक्त जॅकलिन तिच्या रिलेशनशिपमुळेही चर्चेत राहिली आहे तुमच्या माहितीसाठी आपणास सांगू की जॅकलिनने पूर्वी बहरीनचा राजकुमार हसन बिन राशिद अल खलीफा याला डेट केले होते पण दिग्दर्शक साजिदसोबत जॅकलिनच्या अफेअरच्या अफवा समोर येताच त्यांच नातं तुटलं पण नंतर साजिद आणि जॅकलिनचेही ब्रे कअप झाले

जॅकलिनचे नाव इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्रीत समाविष्ट आहे बहुतेक व्हायरल झालेल्या फोटोत किंवा व्हि डिओत ती जीममध्ये घाम घाळताना दिसते जॅकलिनच्या शिक्षणाबद्दल बोलताल तर तिने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे या कोर्समध्ये पदवी घेतल्यानंतर जॅकलिनने श्रीलंकेच्या एका टी व्ही चॅनेलमध्ये रिपोर्टर म्हणून काम करण्यास सुरवात केली जेव्हा तिने वृत्तवा हिनीमध्ये काम केले तेव्हा तिच्या सौंदर्याने तिथली लोक बरेच प्रभावित झाले होते श्रीलंकेतील जॅकलिन सर्वोत्कृष्ट दिसणारी पत्रकार होती जॅकलिनला तिच्या लूकमुळे मॉडेलिंगच्या ऑफर्ससुद्धा मिळाल्या

मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळाल्यानंतर जॅकलिननेही या क्षेत्रात आपला हात आजमावला आणि ग्लॅमरच्या जगात आली २००६ मध्ये तिने मिस श्रीलंका स्पर्धेत भाग घेतला आणि ही स्पर्धा जिंकून मिस श्रीलंका बनली जॅकलिनला तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट २००९ मधील अलादिन हा मिळाला होता पहिल्याच चित्रपटात तिला बॉलिवूडचा शाहेंशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली या चित्रपटात रितेश देशमुख देखील मुख्य भूमिकेत होता यानंतर ती म र्डर 2 किक हाऊसफुल 2 रेस सारख्या बॉलिवूडमधील अनेक नामांकित चित्रपटांमध्ये दिसली पण म र्डर 2 या चित्रपटापासून जॅकलिनला प्रेक्षकांमध्ये खरी ओळख मिळाली

जॅकलिन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहिली आहे आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत राहिली आहे लोकांमध्ये जॅकलिनची लोकप्रियता इतकी जास्त आहे की तिला ३६.१ दशलक्ष जणांनी फाॅलो केले आहे अलीकडे जॅकलिनने तिच्या कमरेवर टॅटू बनविला होता ज्याचा व्हि डिओ तिने इ न्स्टाग्रा मवर शेअर केला होता टॅटूमध्ये तिने इंग्रजी भाषेत मॅजीक लिहिले आहे जॅकलिनने टॅटू केल्याचा हा व्हि डिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलताल तर जॅकलिन लवकरच अ‍ॅ टॅक चित्रपटामध्ये जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे जॅकलिनशिवाय अभिनेत्री रकुल प्रीत सिंहही यात दिसणार आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.