आजची राशी आहे वृषभ
७ फेब्रुवारी ते १३ फेब्रुवारी २०२०

नोकरी व्यवसाय क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. परंतु कौटुंबिक पातळीवर काही अप्रिय घटनांमुळे तुम्ही थोडे त्रासुल जाल. शत्रूच्या शब्दाला अधिक महत्व दिलेत तर मनस्ताप तुम्हालाच होईल. काहींना पित्ताचा त्रास सम्भवतो.
मित्रांवर अजिबात विश्वास ठेवू नका. कलाकारांनी प्रेम प्रकरणात सावधानता बाळगावी. समाजात मानसन्मान मिळाल्याने उगाचच गर्वाने चढून जाऊ नका.

सप्ताहातील शेवटच्या काळात जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार होऊन द्रव्य लाभ संभवतो. नवीन व्यवहार फायदेशीर ठरतील. अन्नधान्य, तेल व खनिज पदार्थाचा व्यापार करणाऱ्यास सप्ताह अधिक लाभदायक ठरेल. प्रकृती बाबत काळजी घ्यावी.
शुभ तारीख : ९,१०,११,१३
ज्योतीषाचार्य – श्रीधर गोखले