कर्क -२२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२०
कामकाजातील प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी युक्तीचा कल्पकतेने केलेला वापर यशस्वी होईल. आर्थिक पातळी उंचावेल. जवळच्या माणसांकडून अति अपेक्षा नको. प्रवासात चोरट्यांपासून सावध रहा. घरात भावाचे किंवा बहिणीचे लग्न ठरेल. पण कुटुंब प्रामुखाणे घरातील आपापसातील मतभेनपासून सावध राहावे. अचानकपणे मंगल कार्यात विघ्नही येतील. त्यामुळे उदास व्हाल. पण त्यावेळी मात्र जीवनाच्या जोडीदाराचे सहकार्य लाभेल. पैशाचे व्यवहार जपून करा. कौटुंबिक कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीशी समजूतदारपणे वागा.
शुभ तारीख-२२,२५,२८

मिथुन-२२फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२०
ग्रहमान पूर्णपणे साथ देणारे, अनुकूल असे आहे. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. तुमच्या शब्दाला महत्व प्राप्त होईल. सरकारदरबारी प्रतिष्ठा वाढेल. मित्र मंडळींच्या सहवासात आनंदून जाल.आपापसातील मतभेद दूर होतील. कर्ज देण्याघेण्यापासून सावधानता बाळगावी. नाहीतर हानी होईल. भविष्यातही आपण अडचणीत याल. कला क्षेत्रातील व्यक्ती आर्थिक लाभ प्राप्त करू शकतात. श्रमिक वर्ग विवाह कार्यात प्रसन्नता अनुभवतील. जे कार्य आपण करीत असाल त्यातच आपणास यश मिळेल. व्यवसायात परिवर्तन करण्याचा विचार करू नका. बेरोजगार व्यक्ती नवीन व्यवसायाचा विचार करू शकता. प्रवास करू नका.
शुभ तारीख-२३,२५,२७

ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले.

टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.