बॉलिवूड अभिनेत्री कल्कि केकलां लवकरच आई होणार आहे गेल्या वर्षी आपण गरोदर असल्याचे तिने उघड केले होते कल्की बर्‍याच दिवसांपासून तीचा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गला डेट करत आहे आजून पर्यंत त्यांनी लग्न केलेले नाही परंतु कल्कि केकलां लग्नाआधी आई होण्याबद्दल खूप उत्सुक आहे ती वारंवार तिच्या गर्भधारणेविषयी आणि येणाऱ्या छोट्या पाहुण्याबद्दल माध्यमांशी बोलत असते यावेळी लग्नाआधीच ती आई होणार असल्याचे कुटुंबीयांना सांगताना कल्की केकलांने तिच्या कुटुंबीयांच्या प्रतिक्रियेबद्दल खुलासा केला आहे

कल्कि केकलां नुकतीच अभिनेत्री करीना कपूरच्या रेडिओ शो व्हाट वुमन वान्ट मध्ये आली होती जिथे तिने आपल्या गरोदरपणाबद्दल बरेच काही सांगितले कल्की आपल्या पहिल्या मुलासाठी किती उत्सुक आहे हे ही तिने करीनाशी शेअर केले जेव्हा तिने तिच्या गरोदरपणाबद्दल कुटुंबाला सांगितले तेव्हा त्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केली हे देखील तिने सांगितले आहे कल्की म्हणाली की त्यांना या गोष्टीचा आनंद आहे की त्यांचे आणि गाय हर्शबर्ग याचे कुटुंब बरेच अपारंपरिक आहे

ती म्हणाले की आमची दोन्ही कुटुंबे बरीच अपारंपारिक आहेत लग्न आणि इतर गोष्टींबद्दल ते पारंपारिक विचार करत नाहीत माझ्या आईने मला सांगितले हे बघ पुढच्या वेळी तू लग्न करशील तेव्हा पूर्णपणे खात्री करून कर हे तुझे आयुष्य आहे कल्कि केकलां म्हणाली की तिची आई यामुळे असे म्हणाली आहे की या अगोदर एकदा माझा घ टस्फो ट झाला आहे त्यामुळे त्यांना माझ्या लग्नाची घाई नाही हि लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की कल्की केकलांने आपले पहिले लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपशी यांच्याशी 30 एप्रिल 2011 रोजी केले होते कल्किने देव डी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही जवळ आले होते पण हे सं बंध फार काळ टिकू शकले नाहीत

हे दोघे दोन वर्षातच वेगळे झाले अनुरागचे हे दुसरे आणि कल्किचे पहिले लग्न होते दुसरीकडे आपल्या मुलाबद्दल बोलताना कल्कि केकलांन म्हणाली की ती वृद्धांच्या प्रथेनुसार नैसर्गिक पद्धतीने त्या मुलास जन्म देणार आहे यासाठी ती ऑपरेशनचा किंवा कोणत्याही हॉस्पिटल किंवा दवाखान्यातील सुलभ पध्दतीचा अवलंब करणार नाही आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आपण नक्कीच औषध घेऊ कल्कि पहिल्यांदाच तिचा प्रियकर गाय हरशबर्गसोबत आई होणार आहे यासाठी ती खूप उत्साही आहे ती स्वत: ला आपल्या मुलाचे संगोपन आणि परिस्थिती हाताळण्यासाठी तयार करीत आहे तिच्या आई वडिलांप्रमाणेच कल्कि आपल्या मुलाचे संगोपन करणार आहे

मार्गरीटा विथ ए स्ट्रॉ या चित्रपटाच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारी अभिनेत्री कल्कि म्हणते की समाजातील सर्व चांगल्या व वाईट गोष्टी इतर कोणाकडून घेण्यापेक्षा माझ्या आई वडिलांकडुन घेण्यास मला आवडेल मी पांडिचेरीमध्ये लहानाची मोठी झाली आहे आणि माझे पालक समाजाबद्दल अगदी प्राकृतिक आहेत माझ्या आईने मला घरी जन्म दिला आणि कोणतीही समस्या नव्हती मी क्लिनिकमध्ये माझ्या मुलालाही जन्म देईन गरज भासल्यास माझ्याकडे औषधाचा पर्यायही आहे द तारा शर्मा शो वरती तिने या गोष्टींचा खुलासा केला आहे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.