मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नेस्ले कंपनीच्या मॅगी या उत्पादनाबद्दल, जिने उत्कृष्ट चवीच्या जोरावर लहान मुलांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना वेड लावले. मित्रांनो आता तुम्हीच सांगा २ मिनिटात भूक मिटवण्याचा दुसरा या पेक्षा सोपा मार्ग असू शकतो का, जे विद्यार्थी घरापासून दुर बाहेर शिक्षनासाठी शहरात राहतात,त्या मुलांचा हा आवडता नाश्ता आहे,शहरांतच नाहीतर तिर्थस्थळी अगदी ज्या ठिकाणी अन्न उपलब्ध नसते तेथेही मॅगी एकदम आरामात मिळते आणि डोंगरावर मॅगी खाण्याची मजा काही औरच असते, थंड थंड वातावरणात गरम गरम मॅगी.आले ना तुमच्या तोंडाला पाणी म्हणूच मित्रांनो तुमच्या याच मॅगीवर असलेल्या प्रेमाखातीर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत मॅगी विषयीची पुर्ण माहिती.

तर मित्रांनो,आपण सुरुवाती पासून जाणून घेऊयात मॅगीविषयी मित्रांनो या गोष्टीची सुरुवात होत ९ ऑक्टोबर १८४६ पासून झाली जेव्हा मॅगीचे संस्थापक ज्यूलियस मॅगी यांचा जन्म झाला ज्यूलियस मॅगी यांचे पुर्ण नाव ज्यूलियस मायकेल जोहान्स मॅगी असे आहे ज्यूलियस यांनी आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी वडीलांचा.आटा कारखाना सांभाळायला सुरूवात केली त्या दिवसांत आटा कारखान्याचा व्यवसाय बर्‍यापैकी चांगल्या स्तरावर होता परंतु नंतर बघता बघता व्यवसाय मंद होत गेला त्यामुळे ज्युलियस मॅगीने दुसरा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला प्रत्यक्षात हा काळ तो होता जेव्हा जगात औद्योगिक क्रांती सुरू होती.बरेचनवीन कारखाने उघडत होते आणि जुन्या कारखाने तंत्रज्ञानाशीही जोडले जात होते आणि तेव्हाच कारखान्यात काम करणाऱ्या लोकांच्या खाण्यात न्यूट्रिशन आणण्याच्या उद्देशाने त्यांनी फुड प्रॉडक्ट मध्ये प्रवेश केला आणि त्यांनी १८८६ मध्ये रेडिमेड सूप बनवायला सुरुवात केली, खरं तर हे सूप लेग्यूम मिल्स पासून बनवलेले होते. यात प्रोटीनचे प्रमाण जास्त होते.

त्यानंतर ज्यूलियस मॅगी यांनी १८८७ मध्ये मॅगी जीएमबीएच नावाने आपली कंपनी रजिस्टर्ड केली आणि त्या बरोबर मॅगी नूडल्स, मॅगी क्यूब्स आणि मॅगी स्वास हे प्रॉडक्ट बाजारात आणले त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात झालेल्या बदलांसोबत, मॅगी स्वित्झर्लंडची कंपनी नेस्लेमध्ये विलीन झाली खरं तर नेस्ले कंपनीची सुरूवात १८४६ मध्ये झाली होती.ही कंपनी लहान मुलांन साठीचे दुधापासून बनलेले प्रॉडक्ट बनवत असत मॅगी नेस्ले मध्ये विलीन केल्यानंतर नेस्लेने मॅगीची जोरदार जाहीरात सुरु केली ज्यामध्ये असे दाखवले गेले की हे पौष्टिक अन्न त्यांच्यासाठी आहे ज्यांना वेळ नाही आणि ते फक्त २ मिनिटात तयार केले जाऊ शकते. ही जाहीरात लोकांच्या मनाला भावली आणि त्यानंतर मॅगी नूडल्सचा आपल्या स्वादिष्ट चवीच्या जोरावर व्यवसाय वाढत गेला तस पाहीला गेले तर मॅगीचा भारतात प्रवेश केला १९८३ मध्ये झाला असला तरी देखील भारतीय बाजारात मॅगी नूडल्स आल्यानंतर काही वर्षातच मॅगीची भारतीय बाजारात ७५ टक्के भागीदारी झाली. असे कोणाला वाटले देखील नसेल की हे प्रॉडक्ट भारतात सर्वाधिक चालेल. मॅगी खाणाऱ्या १०० लोकांपैकी ७५ लोक फक्त भारतातील आहेत आणि त्यामुळे मॅगीने भारतीय बाजारात आपले स्थान कायम केले आहे.