सिंह – ५ एप्रिल ते ११ एप्रिल
चर्चेने समस्या सुटतात वादविवादाने नाहीत. गोड बोलून विषय हातावेगळे करण्याचा प्रयत्न करा. मागील काही घटनाक्रमचे पडसाद आता उमटल्याने मनःस्थिती वर थोडा परिणाम होईल. संयम बाळगा. कौटुंबिक गरजांना प्राधान्य द्यावे लागेल.
शत्रू आपल्याबरोबर राहून आपणास अडचणीत आणेल. पूर्ण अनुकूलता प्राप्त करण्यासाठी धूमावती व्रत करावे अथवा दुर्गादेवीची आराधना करावी. कोर्टकचेरीमधील प्रकरणामुळे दुर्लक्ष करू नका. जे काही आपण करू इच्छिता ते स्वतःच्या हिमतीवर करावे त्यातच यश आहे. संयम व विवेक पाळून काम केल्यास आपण प्रत्येक ठिकाणी यश मिळवलं.
शुभ तारीख- ५,६,९,१०

कन्या -५एप्रिल ते ११ एप्रिल
कार्य तत्परता आणि मनोवस्था यांच्यातील द्वंद्वामुळे थोडा संभ्रम निर्माण होईल. परंतु सध्यातरी कर्तव्य दक्ष राहणेच फायद्याचे आहे. आप्तेष्टांबरोबरच काही मतभेद संभवतात. महिलांना कार्यसाफलतेचा आनंद उपभोगता येईल.
कोर्टकचेरीमधील प्रकरणाकडे दुर्लक्ष करू नका. त्याचप्रमाणे घरात पूर्ण शांत वातावरण ठेवा नाहीतर अडचणीत याल. जे काही आपण करू इच्छिता ते स्वतःच्या हिमतीवर करा. त्यातच यश आहे. संयम व विवेक पळून काम केल्यास आपण प्रत्येक ठिकाणी यश मिळेल. पूर्ण अनुकूलता प्राप्त करण्यासाठी देवीची आराधना करा.
शुभ तारीख-६,९,११

टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.

ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले