बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. या कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना नेहमीच आवडला आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक बालकलाकार आहेत जे आता मोठे झाले आहेत.

त्यातील एक बालकलाकार मकडी चित्रपटात काम केले आहे. मकडी हा चित्रपट 2002 साली आला होता. लहान मुलांवर आधारित हा चित्रपट होता. ज्यामध्ये शबाना आझमी यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. तर मुख्य अभिनेत्री श्वेता बसू प्रसाद या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती.

मकडी चित्रपटात श्वेता बसू प्रसादने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने जुळ्या बहिणींची भूमिका साकारली होती. ज्यामध्ये ऐकीचे नाव चुन्नी आणि दुसऱ्याचे नाव मुन्नी होते. मकडी चित्रपटातली ही बालकलाकार अता मोठी झाली आहे. श्वेता बसू प्रसाद आता साऊथ सिनेसृष्टीत खूप सक्रिय आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. साऊथ सिनेमाशिवाय श्वेता बसू प्रसाद बॉलीवूड आणि अनेक वेब सीरिजमध्येही दिसली आहे.

श्वेता बसू प्रसाद आता 31 वर्षांची झाली असून सौंदर्यात साऊथ सिनेमासह बॉलिवूडच्या देते अनेक अभिनेत्रींना टक्कर. श्वेता बसू प्रसाद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी ती अनेकदा खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. श्वेता बसू प्रसाद शेवटची वेब सीरिज रे मध्ये दिसली होती. या मालिकेत त्याने Forget Me Not या एपिसोडमध्ये काम केले होते. रे ही वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाली होती.