लोक मंदिरात गेल्यावर नतमस्तक होतात आणि देवापुढे प्रार्थना करतात देवाची उपासना करतात. आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक ठिकाणी मंदिरे बांधली गेली आहेत. प्रत्येक मंदिर हे विशिष्ट एका देवाच्या नावाने मोठ्या श्रद्धेने बांधलेले असते. मंदिरात प्रवेश करण्यासंबंधित काही नियम असतात आपणांस या नियमांचे पालन करावे लागते. या नियमांपैकी एक म्हणजे मंदिराच्या बाहेर चप्पल आणि बूट काढणे. एखाद्याला बूट आणि चप्पल बाहेर काढल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जातो तुम्हाला कधी मनात असा प्रश्न आला आहे का केवळ अनवाणी पायानेच मंदिरात प्रवेश का देतात आणि मंदिराबाहेर बूट आणि चप्पल का काढले जातात या कारणामुळे मंदिराच्या बाहेर बूट आणि चप्पल काढल्या जातात.मंदिराबाहेर बूट आणि चप्पल बाहेरच
मंदिरे हि पवित्र असतात- मंदिर हे एक पवित्र असे स्थान आहे म्हणून मंदिरात बूट आणि चप्पल आत नेण्यास मनाई केली जाते जर आपण बूट आणि चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला तर मंदिरातील पवित्रता भंग होते.

असते नकारात्मक ऊर्जा- बूट आणि चप्पल नकारात्मक उर्जाशी संबंधित आहेत आणि असे मानले जाते की यांचा संबंध पाताळाशी आहे. वास्तविक रज आणि तम धातूचा वापर बूट आणि चप्पल तयार करण्यासाठी केला जातो आणि हे दोन्ही धातू पाताळातुन येणारी नकारात्मक उर्जा पृथ्वीशी जोडण्याचे कार्य करतात.

मंदिरातील वातावरण स्वच्छ राहण्यासाठी- मंदिराती वातावरण पूर्णपणे शुद्ध आणि पवित्र असते. त्याच वेळी जेव्हा आपण बूट आणि चप्पल घालून मंदिरात प्रवेश करतो तेव्हा त्यातील धूळीचे कण मंदिरातील वातावरण दूषित करतात म्हणून बूट आणि चप्पल मंदिराच्या बाहेर काढल्या जातात.

देवाचा आदर राखण्यासाठी- मंदिरात प्रवेश करतांना आपण आपले बूट आणि चप्पल काढून शुद्ध शरीराने परमेश्वरासमोर नतमस्तक होतो मंदिराबाहेर चप्पल काढणे म्हणजे घाणीस मंदिराबाहेर रोखणे असा अर्थ होतो.

मनापासून पूजा होते- पुराणात असे स्पष्टपणे लिहिले आहे की जेव्हा आपण मंदिरात किंवा देवाच्या कोणत्याही स्थळी प्रवेश करतो तेव्हा आपण अनवाणी पाय जायला पाहिजे आणि बूट आणि चप्पल बाहेर काढले पाहिजे जेणेकरून या अपवित्र गोष्टी देवाच्या जवळच्या वातावरणाला प्रदूषित करु शकणार नाही.

मंदिरात प्रवेश करण्यासंबंधित इतर काही नियम- बूट आणि चप्पल याशिवाय जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आपले डोके कपड्याने झाकले पाहिजे. त्याच वेळी बूट आणि चप्पल काढल्यानंतर आपल्या हातांनी पाय पाण्याने व्यवस्थित स्वच्छ केले पाहिजेत आणि त्यानंतरच पूजा सुरू करावी.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.