पोटाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. जर पोट फिट नसेल तर शरीर अनेक आजारांचे माहेरघर बनतं. सध्याच्या धावपळीच्या जीवनात बाहेरचे
खाणे, जंक फुड वगैरे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. यामुळे मलावरोध, अपचन, गॅस, अँसीडीटी, पोटदुखी, पोटावर सुज, अन्नातून विषबाधा वगैरे तक्रारी उद्भवू शकतात. ५ पैकी ३ लोकया तक्रारींमुळे त्रस्त असतात.अशावेळी आपला आहार आणि जीवनशैलीत बदल करून पोटाच्या
अनेक समस्यांपासून केवळ सुटकाच मिळवू शकत नाही, तर आपली पचनशक्तीसुद्धा सुधारू शकतो. तर जाणून घेऊ पोट फिट ठेवायचे काही खास
उपाय :

१) हायड्रेटेड राहा : नियमित एवढे पाणी प्यायल्याने पोटाच्या तक्रारी कमी होऊ लागतात आणि चेहर्यावरील चमक वाढते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने मलावरोध, गॅस, अॅसिडिटी, अपचन इत्यादी तक्रारींपासून दूर राहता येते.

२) दही : दह्याचे अगणित फायदे आहेत. ओवा टाकून खाल्ल्यास मलावरोधाची तक्रार दूर होते, निर्यमित दही खाल्ल्यास पोटाच्या अनेक तक्रारींपासून सुटका होऊ शकते. यात चांगले बॅक्टेरिया असतात, जे पोटाच्या आजारांना ठीक करतात.

-: रिकाम्या पोटी या पदार्थाचे सेवन करा- : सकाळीसकाळी रिकाम्या पोटी एखाद्या अशा पदार्थाचे सेवन करायाला हवे, जो पोटात आम्ल तयार करेल. संत्रे, मोसंबी,लिंबू यांसारखी आंबट फळं, टोमॅटो,मसालेदार जेवण, तेलकट जेवण, सोडा, मद्य,कॉफी, चहा, वगैरेंचे सेवन टाळायला हवे.

१) आवळा : रोज १ कप पाण्यात २ चमचे आवळयाचा रस टाकून प्यावा. यामुळे पोटातून विषारी पदार्थ निघून जातात.असे केल्याने पोट निरोगी राहते, सोबतच केसही काळे आणि दाट होतात.

२) उत्तम आहाराचे सेवन : उत्तम आहार ना केवळ ऊर्जा आणि ताकत देतो, तर पोटालासुद्धा स्वस्थ ठेवतो. आपल्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी आणि मोसमी फळं, सुका मेवा, मोड आलेली धान्ये इत्यादी सामील करा.

३) रिकाम्या पोटी कोमट पाणी प्या : रोज सकाळी उठल्याउटल्या कोमट पाणी प्यायल्याने शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो यामुळे पचनक्रिया सशक्त होते आणि वजन कमी करण्यासही मदत होते. कोमट पाणी शरीरात ऊर्जा निर्माण करते, ज्याने पोट आणि शरीर दोन्ही फिट राहतात.

४) जेवण हळूहळू आणि चावून घ्या : आजच्या धावपळीच्या जीवनात अधिकांश लोक घाईत जेवण जेवतात, ज्यामुळे ते जेवण नीट न चावता गिळून टाकतात. ही चूक सामान्यतःपोटासाठी त्रासदायक ठरते. यामुळे पोटदुखी,गॅस आणि अपचन अशा तक्रारी सुरु होतात. हळूहळू चावून खाल्याने जेवन लवकर पचते. आणि पोटात अडकण्याचीही भीती राहत नाही.एवढेच नाही तर असे केल्यास गॅसच्या तक्रारीपासुनही सुटका मिळते.

५) कोल्ड ड्रिंक व जंक फूडपासून दूर राहा : कोल्ड ड्रिंक आणि फास्ट फूड दोन्ही शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात. यामुळे पोटात गसही निर्माण होतो. याच्या सेवनाने पोटाच्या अनेक तक्रारी उद्भवण्यासोबतच पचनक्रियासुद्धा बाधित होते. ड्रिंक ऐवजी जागी ज्यूसचे सेवन करा आणि जंक फुडचे कमीतकमी सेवन करा.

६) जेवणाची योग्य वेळ : जर तुमच्या जेवणाची वेळ ठरलेली नसेल तर आजपासून ही सवय बदला. नाश्ता, लंच आणि डिनर या तिघांची वेळ ठरवा अशाप्रकारे अपचन, पोटदुखी, गॅस, भूक न लागणे, अॅसिडिटी, पोटावरील सूज इत्यादी तक्रारी टाळता येऊ शकतात.