१)चकोल्या –
साहित्य-चकोल्यांसाठी:१/२ ते ३/४ कप गव्हाचे पीठ,१/२ टीस्पून मीठ,१ टीस्पून तेल,आमटीसाठी,१/२कप तूर डाळ. फोडणीसाठी-१टीस्पून तूप,१/८ टीस्पून मोहोरी,१/४ टीस्पून जिरे,चिमूटभर हिंग,१/४ टीस्पून हळद,१/४ टीस्पून लाल तिखट,१ हिरवी मिरची,४ ते ५ कढीपत्ता पाने, २ टेबलस्पून कोथिंबीर,बारीक चिरून,२ आमसूल,१ टेस्पून गूळ(ऐच्छिक !१टीस्पून गोडा मसाला,२ टेस्पून ताजा खोवलेला नारळ,साजूक तूप,चवीपुरते मीठ.

कृती -तूरडाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी. नंतर डाळ घोटून घ्यावी. गव्हाचे पीठ,मीठ आणि १ टीस्पून तेल घालून पोळीसाठी मळतो तशी कणिक मळून घ्यावी. कढईत १टीस्पून तूप गरम करून त्यात मोहोरी, जिरे,हिंग,हळद,लालतिखट,मिरची आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. कोथिबिरही फोडणीत घालून परतावी. घोटलेली डाळ फोडणीस घालावी. १/२ ते ३/४ कप पाणी घालून डाळ थोडी पातळ करावी. गोडा मसाला, मीठ,आमसूल,नारळ आणि गूळ घालून मध्यम आचेवर आमटीला उकळी येऊ द्यावी. उकळी येत असताना कणकेची पोळी लाटावी. कातणाने किंवा सुरीने मध्यम आकाराचे शंकरपाळे करून उकळत्या आमटीत घालावे. ५ मिनिटे उकळी काढून चकोल्या शिजू द्याव्यात. चकोल्या ताटात वाढून त्यावर साजूक तूप घालून गरमागरम सर्व्ह करावे.

२)शेंगदाण्याची उसळ-
साहित्य -३/४ कप शेंगदाणे,१ टीस्पून तूप,१/२ टीस्पून जिरे ,४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट,१/२कप पाणी,२ आमसूल,२-३हिरव्या मिरच्या,१ टीस्पून गूळ, चवीपुरते मीठ.

कृती -शेंगदाणे ५-६तास भिजवून ठेवावे. नंतर प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावे. शिजवलेल्या शेंगदाण्याची उसळ करून घ्यावी. उसळीसाठी आधी ४ टेस्पून शेंगदाण्याचा कूट आणि १/२ कप पाणी एकत्र मिक्सर मध्ये फिरवावे,यामुळे हे मिश्रण दाटसर होईल आणि उसळीला थोडा दाटपणा येईल. नंतर पातेल्यात तूप गरम करून त्यात जिरे मिरचीची फोडणी करावी. त्यात कुटाचे मिश्रण घालावे. आवडीप्रमाणे थोडे पाणी वाढवून पातळ करून घ्यावे. यात आमसूल,मीठ आणि गूळ घालून एक उकळी येऊ द्यावी. नंतर शिजलेले शेंगदाणे घालून मध्यम आचेवर उकळी काढावी. या उसळीला थोडा रस ठेवावा.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी व रेसीपी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.