कुंभ-१ मार्च ते ७ मार्च

धंदा चांगला चालेल. आर्थिक प्राप्ती होईल. परदेशगमन घडेल. हौसमौज कराल. घरगृहस्थीमध्ये समस्या असतील. विपरीत बुद्धी होईल. भाग्यकारक अनुभव येईल. खरेदी-विक्री वाढेल. बढती मिळू शकेल. अचानक लाभ संभवतो.मित्राचा सहयोग मिळणार आहे. पण एखादा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना अधिकरी वर्गाचे सहकार्य मिळेल. आपल्या प्रयत्नामुळे मित्राचे एखादे काम होईल. डॉकटर किंवा महसूल खात्यातील. व्यक्तींना हा आठवडा संताप जनक असा आहे. प्रवास करण्याचे टाळावे लागेल. मित्रांकडून सहकार्याची अपेक्षा करणे व्यर्थ ठरणार आहे. जवळच्या व्यक्तीकडून सहकार्य मिळून आपले काम साधून घ्या.
शुभ तारीख- १,२,४,७

मिन-१ मार्च ते ७ मार्च

आर्थिक येणे वसूल होईल. कर्तव्यपूर्तीकडे जास्त लक्ष द्याल. आवडत्या छंद जोपासायला वेळ मिळेल. वेळ व पैसे खर्च होतील. नोकरी प्रवसाचे योग या सप्ताहातही संभवतील. व्यवसायिकांना आठवडा चांगला जाईल. वाहन चालविताना काळजी घेणे जरुरीचे आहे. मुलाच्या सहकार्यामुळे मानसिक शांती मिळेल.
कष्टकरी, कामकरी लोकांनी ऐतखाऊपणा सोडून देऊन स्वकष्टावर कमवून खावे, त्यांना हा सप्ताह साधारण चांगला जाईल. कुटुंबातील व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याच्या छोट्यामोठ्या कुरबुरीने त्रस्त व्हाल. बेरोजगारांना नोकरी मिळेल.
शुभ तारीख- २,४,७

ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले

टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.