मिथुन-८मार्च ते १४ मार्च २०२०

ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. प्रयत्नांना यश मिळेल. नुकत्याच सहवासात आलेल्या व्यक्तींवर विश्वास टाकू नका. संयमाने वागावे लागेल. डोळ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. हा आठवडा आंनदायी असेल.विविध प्रकारच्या योजना बनविण्याची आंकाक्षा आहे. परंतु प्रथम काम पूर्ण करा. पूर्ण अनुकूलता प्राप्त करण्यासाठी गणपतीचे व्रत करा. जे करण्याची इच्छा असेल ते करा. वेळ चांगली आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता.
शुभ तारीख- ९,१०,१२

कर्क-८ मार्च ते १४ मार्च २०२०

तुमच्यात माणसे हाताळण्याचे आणि राखण्याचे, अतिशय उत्तम कौशल्य आहे. ओले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता थोडी पडती बाजू घेतलीत तर बिघडले कुठे? मतभेद शक्यतो टाळाच कलावंतांना प्रसिद्धीचे योग आहेत.प्रभूचे नाम घ्या. दैव बलवत्तर पण तरीही आपल्या हातात काही नसते याचे भान ठेवावे. एखादी सुन्न घटना घडेल. पण खचू नका. हा आठवड्याचा काळ समजदारीने काम करण्याचा आहे. व्यवसायाबाबत केलेला प्रवास लाभदायक होईल. धार्मिक कार्यात आपण व्यस्त राहाल. कला जगतातील व्यक्तींना मानसन्मान, आर्थिक प्राप्ती होईल.
शुभ तारीख- १०, १२,१३

ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले

टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.