ओठांना मऊ आणि सुंदर बनविण्यासाठी लोक लिप बाम वापरतात परंतु ओठांवर वारंवार लिप बाम लावल्याने आरोग्य आणि ओठ खराब होऊ शकतात कारण लिप बाम तयार करण्यासाठी बरीच हानिकारक रसायने वापरली जातात इतकेच नाही तर अशा प्रकारचे धो कादायक घटक कर्करोगास कारणीभूत असलेल्या अनेक लिप बामांमध्येही आढळतात त्यामुळे आपल्या ओठांना मऊ आणि सुंदर बनविण्यासाठी लिप बाम वापरण्याऐवजी घरगुती पद्धतींचा अवलंब करा ओठांची काळजी कशी घ्यावी ते तुम्हाला सांगणार आहोत चला तर त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात

जास्तीत जास्त पाणी प्या- जे लोक कमी पाणी पिततात त्यांच्या ओठांवर वाईट परिणाम होतो आणि ओठ फाटू लागतात म्हणून कमी पाणी पिऊ नका आणि दिवसाला किमान आठ ग्लास पाणी प्या पाणी पिल्यामुळे ओठ फाटत नाहीत आणि मऊ होतात

मासे खा- मासे खाल्ल्याने शरीरात ओमेगा 3 फॅटी अॅसिडची कमतरता उद्भवत नाही वास्तविक ओमेगा 3 फॅटी अॅसिड त्वचा हायड्रेट ठेवतात म्हणूनच आपण मासे खाणे आवश्यक आहे तथापि ज्या लोकांना मासे खायला आवडत नाहीत त्यांनी फिश ऑइलच्या गोळ्या घेतल्या पाहिजे

तूप- ज्या लोकांना मऊ आणि गुलाबी ओठ पाहिजे आहेत त्यांनी झोपण्यापूर्वी रोज रात्री ओठांवर तूप लावून मालीश करा तूप लावल्याने ओठ खूप मऊ होतील आणि फाटणार नाहीत तुम्ही गावरान तुपाऐवजी बदाम किंवा जोजोबा तेल देखील वापरू शकता

नाभीवर तेल लावा- ओठांना मऊ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपण झोपण्यापूर्वी दररोज रात्री आपल्या नाभीवर मोहरीचे तेल लावावे मोहरीचे तेल लावल्याने ओठ फाटत नाहीत आणि मऊ राहतात

ओठांना स्क्रब करा- आठवड्यातून एकदा ओठ स्क्रब केले पाहिजेत स्क्रबिंग ओठांना मऊ ठेवते आणि ओठांवरील मृत त्वचा स्वच्छ करते ओठ स्क्रब करण्यासाठी साखर किंचित बारीक करून घ्या यानंतर त्यात थोडे नारळ तेल घाला हे स्क्रब ओठांवर हलके चोळा थोडावेळ ओठांवर घासल्यानंतर पाण्याने ओठ स्वच्छ करा असे केल्याने ओठ पूर्णपणे गुलाबी दिसतील आणि मऊ होतील

या गोष्टी लक्षात ठेवा- जास्त काळ लिपस्टिक लावू नका
महिलांचे मेक अप लिपस्टिकशिवाय अपूर्ण असते आणि बहुतेक प्रत्येक महिला त्यांच्या ओठांवर लिपस्टिक लावतात परंतु जास्त काळ लिपस्टिक लावण्याने ओठांच्या त्वचेचे नुकसान होते म्हणून जास्त काळ लिपस्टिक लावू नका आणि फक्त चांगल्या कंपनीची लिपस्टिक वापरा

ओठ चावू नका- अनेकांना ओठ चावण्याची सवय असते जी बरोबर नाही ओठ चघळण्याने त्वचेवर वाईट परिणाम होतो आणि बर्‍याच वेळा ओठातून रक्त येऊ लागते म्हणून आपण कधीही आपले ओठ चावू नये.

नोट: कोणत्याही उपायावर अमल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे फा यदेशीर आणि योग्य ठरेल.