शाहरुख खान आणि काजोल ची मुख्य भूमिकेने सजलेली फिल्म ‘दिलवाले दुलहनिया ले जायेंगे’ ने २५ वर्षे पूर्ण केले आहे. चित्रपट २० ऑक्टोबर १९९५ मध्ये रिलीज झाला होता. डीडीएलजे ने शाहरुख च्या करीयर ला नवे वळण दिले परंतु तुम्हाला माहीत आहे का की पाहिले शाहरुख ह्या फिल्म मध्ये काम करायचे नव्हते.

‘दिलवाले दुलहनिया ले जायेंगे: ए मॉडर्न क्लासिक’ पुस्तकानुसार, शाहरुख पाहिले ही फिल्म करू इच्छित नव्हते कारण त्यांना फिल्म ची गोष्ट आवडली नव्हती ज्यामध्ये एक मुलगी पळत सुंदर जागेवर गाणं म्हणण्याचा कन्सेप्ट होता. शाहरुख ला वाटत होतं हा कन्सेप्ट काही ठीक नाहीये.

९० दशकाच्या मध्यात पहिलेपासून अमीर खान आणि सलमान खान ची प्रतिमा एक लव्हर बॉय ची होती आणि ते खूप सफल होते. अश्यामध्ये शाहरूख ला वाटत होते की हा ही लव्हर बॉय सारखाच किरदार होऊन जाईल. ते ह्या सगळ्या पासून काही वेगळे करू इच्छित होते. जेव्हा फिल्म चे निर्देशक आदित्य चोप्रा ने शाहरुख ला ह्याची गोष्ट सांगितली तेव्हा त्यांनी नकार दिला होता.

शाहरुख खान चा नकार ऐकल्यावर आदित्य चोप्रा खूप परेशान झाले होते. आदित्य फिल्म च्या कामानिमित्त शाहरुख ला खूप वेळेस भेटले. जवळजवळ ३ हप्ते शाहरुख च्या होकाराची वाट पाहिली आणि त्यानंतर आदित्य चोप्रा ने उम्मीद सोडली. ह्यानंतर राज ची भूमिकेसाठी ते सैफ अली खान चा विचार करत होते. फिल्म करण अर्जुन च्या शूटिंग च्या वेळेस शाहरुखने दिलवाले दुलहनिया ले जायेंगे ला होकार कळवला.

काजोल विषयी बोलले तर तिला आपली भूमिका खूप वेगळा वाटला. एका इंटरव्ह्यूमध्ये काजोल म्हणते की, “पाहिले मला सिमरन थोडी बोरिंग वाटली परंतु नंतर मी तिच्या गुण ओळखले. तेव्हा मला वाटले की सगळ्या च्या मनात कुठे ना कुठे एक सिमरन असते. सिमरन च्या मनात नेहमी एक गोष्ट असते की तिला एक चांगले काम करायचे आहे.