“मैदान” १९५६ ते १९६२ मध्ये इंडियन फुटबॉल टीम आणि त्याचे कोच राहिलेले सय्यद अब्दुल रहीमच्या आयुष्यावर आधारित आहे. “तानाजी द अनसंग वारीयर” च्या जोरदार यशानंतर अत्ता अजय देवगण मैदानमध्ये लवकरच दर्शकासमोर दिसणार आहे. मैदानचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे आणि याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

आता लोक या गोष्टीची वाट पाहत आहे कि ते लवकरात लवकर स्क्रीन वर अजय देवगणला नवीन लुक मध्ये बघतील. या चित्रपटाची कथा तेव्हाची आहे जेव्हा भारतीय फुटबॉलचा सुवर्णक्षण होता. लोक खूप दिवसांपासून या चित्रपटाच्या पोस्टरची वाट बघत होते. मैदानचे एका पेक्षा अधिक पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

एका पोस्टर मध्ये अजय देवगण हातात फुटबॉल घेऊन उभा आहे. जेव्हा की दुसऱ्या पोस्टर मध्ये तो आपल्या पायाने फुटबॉलला किक मारत आहे. अजय देवगणच्या या स्टाईलला त्याचे फॅन खूप पसंत करत आहेत. हा चित्रपट नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार आहे. जर अजय देवगनच्या लुक विषयी बोलायचं झालं तर त्याने ग्रे कलरचे डेनिम शर्ट आणि ट्राउझर घातलेला आहे स्वतः अजय देवगणने हे रिलीज झाल्यावर ट्विट केलं आणि लिहिलं “यह उस दौर की बात है जब भारत में फुटबाल का गोल्डन टाइम था.

या पोस्टर मध्ये एक टीम आहे जी पावसात भिजत आहे आणि समोर अजय देवगण उभा आहे. दुसऱ्या पोस्टरला शेयर करताना अजय ने लिहिलं आहे कि “बदलाव लाने के लिए अकेला भी काफी होता है. “मैदान”ची कथा १९५६ ते १९६२ च्या मधील इंडियन फुटबॉल टीम आणि त्यांचे कोच सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. त्यांच्या कोचिंग दरम्यान भारतीय फुटबॉल टीम आपल्या गोल्डन पि रियड मध्ये होती.

१९५६ मध्ये मेलबर्नमधील ऑलम्पिक मध्ये खूप मोठ्या संघांना पराभूत करून भारतीय संघ सेमीफायनलमध्ये पाहोचला होता. यांनतर संघ कधीच या स्तरावर पोहचला नाही. त्यावेळेस टीम इंडियाचे कोच सय्यद अब्दुल रहीम होते.