कलाकार एक परंतु नाव अनेक.प्रत्येक भुमिकेत आपल्या कार्याची छाप सोडणाऱ्या आणि आपल्या अभिनय कौशल्याने हिंदी चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक राहिलेल्या अभिनेत्री जया बच्चन. सत्यजित रे आणि हृषिकेश मुखर्जी यांसारख्या निर्माता आणि दिग्दर्शकांनी त्यांची प्रतिभा दूरूनच ओळखली होती.जया बच्चन या त्या मोजक्या कलाकारापैंकी आहेत ज्यांनी राजकारणाबरोबरच चित्रपटातही समान नाव कमावले. चित्रपट क्षेत्रात सक्रिय असताना, त्यांनी तीन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि तीन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारांसह नऊ फिल्मफेअर पुरस्कार देखील जिंकले आहेत.आज आम्ही तुम्हाला अभिनेत्री जया बच्चन यांच्या आयुष्यातील काही कधीही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत.अभिनेत्री जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे झाला. त्यांचे वडील तरुण कुमार भादुरी हे एक प्रसिद्ध लेखक आणि कवी होते. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण भोपाळमधील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झाले. वडील एक लेखक असल्या,कारणाने घरात सुरवातीपासुनच वातावरण शिक्षणाचे आणि अभ्यासाचे होते आणि बर्याचदा घरात होणार्या चर्चा देखील साहित्य आणि कले विषयीच्याच असायच्या. म्हणूनच जया बच्चन यांचा कल सूरुवातीपासूनच कलेकडे होता.
एके दिवशी जया यांचे वडील त्यांना एका चित्रपटाची शूटिंग दाखवण्यासाठी घेऊन गेले. जयाला तिथे अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी पाहिले. त्यावेळी चित्रपट निर्माते सत्यजित रे आपल्या एका चित्रपटासाठी एक मुलगी शोधत होतो जी की चित्रपटात खास मुलीची भूमिका साकारेल. शर्मिला टागोर यांनी जयाचे नाव समोर ठेवले. जया सत्यजित रे यांच्या ‘महानगर’ चित्रपटाच्या व्यक्तिरेखेत फिट बसल्या आणि त्यांची अभिनय कारकीर्द इथूनच सुरू झाली. हा चित्रपट केल्यानंतर, जया बच्चन यांच्या घरी त्यांच्या पुढील करियर विषयी बरीच चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी शेवटी ठरवलं की आता जया बच्चन यांनी अभिनयाचे शिक्षण घ्यावे. त्यानंतर त्यांना एफटीआयआय मध्ये पाठवण्यात आले. त्यांची कला पाहून त्यांना एफटीआयआयने सुवर्णपदकाने सन्मानित केले. त्यांचे शिक्षण अजून पूर्ण झाले नव्हते, त्या अगोदरच दिग्गज निर्माते-दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी एफटीआयआयमध्ये पोहोचले. आणि ते प्राचार्याशी बोलले आणि जयाला आपल्या चित्रपटात घेण्या विषयी सांगितले.येथूनच जयाला ‘गुड्डी’ या चित्रपटात काम मिळालं.त्याकाळी फिल्म इंडस्ट्रीची परिस्थिती बदलत होती. अमिताभ बच्चन यांना ‘गुड्डी’ या चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून कास्ट करण्यात आले होते, पण जेव्हा दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांना वाटले की या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची कला व्यर्थ जाईल. म्हणून त्यांनी अमिताभ यांना या चित्रपटातून वगळणे योग्य मानले.आणि अमिताभ बच्चन यांना या चित्रपटातून काढून टाकण्यात आले. आणि इथे अमिताभ आणि जया यांची भेट होऊ शकली नाही. त्यावेळी अमिताभ हे ‘आनंद’ या चित्रपटात व्यस्त होते.
जया बच्चन यांचे अभिनेते संजीव कुमारसोबत खूप जवळचे संबंध होते. त्यांनी त्यांच्याबरोबर ‘अनामिका’ या चित्रपटात काम केले.आणि मग पुन्हा ‘कोशिश’ देखील केला. संजीव कुमार त्यांच्या विषयी बोलताना नेहमी असे म्हणायचे की जया ‘अनामिका’ चित्रपटात माझी हिरोइन बनली, ‘कोशिश’ मध्ये माझी पत्नी, ‘शोले’ मध्ये माझी सून आणि ‘परिचय’ मध्ये माझी मुलगी. फक्त एक इच्छा बाकी आहे माझी की मी एख्याद्या चित्रपटात जयाच्या मुलाची भूमिका करावी.जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचा एक फेमस किस्सा आहे. जया ज्यावेळी एफटीआयआयमध्ये शिक्षण घेत होत्या तेव्हा अमिताभ बच्चन हे हृषीकेश मुखर्जी यांच्यासोबत एफटीआयआयमध्येही गेले होते. जयाने तिथे अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा पाहिले. त्यावेळी जयाने त्यांच्या मैत्रींनीना सांगितले की, या मुलामध्ये काहीतरी वेगळे आहे, कारण त्याच्या डोळ्यामध्ये बरीच खोली आहे. काही लोक असे देखील म्हणतात की जया आणि अमिताभ यांच्यातील हे पहील्या नजरेतील प्रेम होत. 1973 मध्ये कोणतीही नवीन हिरोइन अभिनेते अमिताभ बच्चनसोबत काम करण्यास तयार नव्हती. असे म्हटले जात होते की ते आधीपासूनच फ्लॉप झाले आहेत. त्यानंतर जयाने पाऊल पुढे टाकत त्यांच्याबरोबर ‘जंजीर’ चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट करत असताना या दोघांनीही हा निर्णय केला की हा चित्रपट हिट ठरल्यास सुट्टीसाठी परदेशात जायचे. हा चित्रपट सुपरहिट ठरला पण त्या दोघांनाही सुट्टीवर जाऊ दिले नाही. त्याच्या घरच्या लोकांनी त्यांना सांगितले की तुम्हाला सुट्टी वर जायचे असेल तर आधी लग्न करा आणि मग परदेशात फिरायला जा.
‘शोले’ चित्रपटाच्या दरम्यान जया गर्भवती होत्या. त्यांच्या पोटात पहिली मुलगी श्वेता बच्चन होती. त्यानंतर त्यांनी अभिषेक बच्चनला जन्म दिला. त्यावेळी जया सिलसिला या चित्रपटात काम करत होत्या, त्यावेळी त्यांची लहान मुलगी श्वेता म्हणाली की,तू आमच्याबरोबर घरी का राहत नाहीस? फक्त वडीलांच काम करु दे. या गोष्टीने जयाला हादरा दिला. मग त्यांनी ठरवलं की आता या पूढे चित्रपटांत काम करायचे नाही. त्यानंतर जया चित्रपटांमधून बाजूला गेल्या.चित्रपटांपासून लांब असे अंतर ठेवल्यानंतर जया 1998 साली आलेल्या ‘हजार चौरासी की मां’ या चित्रपटामध्ये दिसल्या. यानंतर त्यांनी ‘फिजा’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘लगा चुनरी में दाग’ या चित्रपटांमध्येही काम केले. हळूहळू त्या राजकारणाकडे वळल्या आणि समाजवादी पक्षाच्या सदस्य झाल्या. राजकारणातही त्या खूप सक्रिय आहेत.त्या आपल्या नातवंडांकडे आजी म्हणून लक्ष देण्याबरोबरच सामाजिक कार्यकर्त्या म्हणून देखील कर्तव्य बजावत आहेत.
2008 साली ‘द्रोणा’ चित्रपटाच्या म्युझिक लाँच दरम्यान त्या भाषण देणार होत्या. चित्रपटाच्या दिग्दर्शकाने भाषण इंग्रजीमध्ये तयार केले होते, परंतु त्या म्हणाल्या की,आम्ही उत्तर प्रदेशचे लोक आहोत, म्हणून आपण हिंदीमध्येच बोलू. महाराष्ट्रातील जनतेने माफ करा. त्यांच्या या वक्तव्यावरून बर्याच वादाला तोंड फुटले होते. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना माफी मागण्यास भाग पाडले. शेवटी, त्यांचे पती अमिताभ बच्चन यांनी जयांसाठी माफी मागितली.मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.