साहित्य -१/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे, ३/४ कप बटाट्याचे मोठे तुकडे (बटाटा सोलून),१/२ कप कॉलीफ्लॉवर चे मध्यम तुरे (फ्रोझन),१/२ कप हिरवे मटार (फ्रोझन),१/४ कप फरसबीचे तुकडे (१इंच),१/२कप कांदा,बारीक चिरून ,१ कप टोमॅटो ,बारीक चिरून,१/२ इंच आल्याचा तुकडा, बारीक चिरून, ४ते ६ मोठ्या लसूण पाकळ्या,बारीक चिरून, १ ते दीड चमचे काश्मिरी लाल तिखट,२ चमचे साधं लाल तिखट,१/४ चमचे हळद,६ चमचे तेल,२ चमचे कोल्हापुरी मसाला,इतर मसाले,१/४ चमचे वेलची पावडर,२ चिमटी लवंग पावडर,१/२ चमचे बडीशेप पावडर,१/२ चमचे दालचिनी पावडर,१ चिमटी जायफळ पावडर,चवीपुरते मीठ

कृती-कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात आलं-लसूण भाजून घ्यावे. कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजावे. साधं लाल तिखट आणि टोमॅटो घालावा. मीठ घालून टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत भाजावे. हा मसाला थोडा गार होऊ द्यावा. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यावे. त्याच कढईत ३ चमचे तेल, मध्यम आगेवर गरम करावेत त्यात हळद आणि १/२ चमचे काश्मिरी लाल तिखट घालून लगेच फरसबी आणि बटाट्याचे तुकडे घालावे. मिक्स करून २ते ३ वाफा काढाव्यात. बटाटे किंचितच शिजू द्यावे. आग मोठी करून(बटाटे व तिखट करपणार नाही याची काळजी घ्यावी)कांदा टोमॅटोची प्युरी घालावी. आच मोठी ठेवल्याने तेल व्यवस्थित तापते आणि फोडणी चांगली बसते. मिश्रण नीट ढवळून गरजे पुरते पाणी घालावे.कढईतील मिशनाला उकळी येऊ द्यावी. त्यात कोल्हापुरी मसाला, बडीशेप पावडर, लवंग पावडर,दालचिनी पावडर,वेलचीपूड,आणि चवीपुरते मीठ घालावे. गाजर,मटार आणि कालीफ्लॉवर घालावा. मध्यम आगेवर झाकण ठेवून शिजू द्यावे. १० मिनिटे शिजवावे भाजी तयार झाली कि १ चमचे काश्मिरी लाल तिखट घालावे. आणि लगेचच हि फोडणी भाजीवर ओतावी. ढवळून भाजी सर्व्ह करावी.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ व रेसेपी आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.