१) पंचरत्नी डाळ-
साहित्य -२टेबलस्पून मुगडाळ(सालासकट),२ टेस्पून मसूर डाळ,२ टेस्पून उडीद डाळ,२ टे. स्पून चणाडाळ,२टेस्पून तूरडाळ सर्व डाळी धुवून २ तास भिजवणे. ४ टेस्पून तूप किंवा बटर,१ टीस्पून हळद,चवीप्रमाणे मीठ,१टीस्पून जिरा पावडर,१टीस्पून बडीशेप पावडर,२ टेस्पून दही,अर्धा टीस्पून गरम मसाला.
कृती-कुकरमध्ये तूप गरम करणे. त्यामध्ये शहाजिरे टाकणे. नंतर कांदा टाकणे. परतणे. नंतर सर्व डाळी टाळी टाकणे. ६ ते ७ कप पाणी टाकणे. डाळी चांगल्या शिजवणे.कढईमध्ये तूप टाकणे. त्यामध्ये जिरे,हिंग,लाल मिरच्या,फोडणीला टाकणे. नंतर हि फोडणी डाळीमध्ये टाकणे. चांगली मिक्स करणे. नंतर गरम मसाला, लिंबू रस,कोथिंबीर टाकणे. वरून बटर टाकणे. भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करा.

२)मशरूम मसाला-
साहित्य-अर्धा कि. मशरूम (बॉइल्ड करून). २५० ग्रॅम कांदे,२५० ग्रॅम टोमॅटो,२ टी स्पून आलं, २ टीस्पून लसूण पेस्ट, २टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, १ टीस्पून मिरची पावडर,पाव टीस्पून हळद,१ टीस्पून मीठ,१टीस्पून धने पावडर,१ टी स्पून गरम मसाला, तेल,२ टेस्पून टोमॅटो केचप.
कृती-कढईमध्ये तेल तापत ठेवणे. नंतर कांदा, टोमॅटो(चिरलेला)टाकणे,मशरूम टाकणे. आलं,मिरची लसूण पेस्ट टाकणे. मिरची पावडर, मीठ,हळद,धने पावडर,टोमॅटो केचप टाकणे. शेवटी गरम मसाला पावडर टाकणे.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.