प्रत्येक आई वडील आपल्या मुलांन विषयी हा विचार करत असतात की आपण आयुष्यात जी मेहनत केलीय जो त्रास भोगलाय तो आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये. त्यांनी खूप शिकाव मोठे व्हाव यासाठी ते आपल्या हाडांची काड करून त्यांच्यासाठी मेहनत घेतात पण बरीचशी मुल मोठी झाल्यावर आपल्या आई वडीलांनी आपल्या साठी केलेल्या मेहनतीला व त्यागाला विसरतात आणि आपल्या वृद्ध आई वडीलांना वाऱ्यावर सोडून देतात.

असेच काहीसे घडले आहे यूपीमधील रहिवासी श्रीराम डांगी यांच्या सोबत डांगी यांना चार मुल आहेत आणि चारही मुल चांगल्या प्रकारे कमवात आणि तरीही त्यांना या वयात चौकीदारी करुन आपले पोट भरावे लागते आहे. त्यांच्या चारही मुलांची कमाई चांगली आहे पण तरीही ते त्यांच्या वडीलांना आपल्या जवळ ठेवू इच्छित नाहीत.एक मुलगा प्राध्यापक तर दुसरा कारखान्याचा मालकमग वडिलांनी उचलावे लागले असे पाऊल जे ते स्वत:ह करु इच्छित नव्हते आणि त्यांना या वयात चौकीदारी करण्यास भाग पडले. आज आम्ही तुम्हाला एका वयोवृद्ध व्यक्तीबद्दल सांगत आहोत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या मुलांना घडवण्यासाठी घालवले आणि आता जेव्हा ही मुले आपल्या पायावर उभी आहेत आणि त्यांना आशा आहे की आता आपली मुले आपल्यासाठी काही करुन दाखवतील. पण आता त्यांना या वयात चौकीदारी करुन आपले पोट भरावे लागत आहे.

ही बातमी आहे अशबाग स्टेडियम जवळ जगन्नाथ गल्ली नंबर 2 मध्ये राहणाऱ्या श्रीराम डांगे यांची. श्री राम यांचा मोठा मुलगा शिवराज सिंह डी -१९ मुस्कान कॉम्प्लेक्स अयोध्या बायपास मिलिटरीमधून निवृत्त झाला आहे आणि तो आता अमरावतीत खासगी नोकरी करतो आणि त्याला दरमहा 95 हजार रुपये इतका पगार मिळतो. वयोवृद्ध श्रीराम यांचा दुसरा मुलगा ओमप्रकाश सिंह हा आहे सागर व्हीआयपी मार्केटमध्ये राहतो आणि तेथे कोचिंग चालवतो तसेच इंदोरमध्ये वेल्डिंग रॉडचा कारखाना देखील चालवतो त्याला दरमहा 50 हजार रुपयांची कमाई होते. श्रीराम यांचा तिसरा मुलगा रामबाबू सिंह रहीवासी.

मेरुखेरी पोस्ट सोजना गुलाबगंज विदिशा येथे राहतो आणि तेथे त्याची जमीन व ट्रॅक्टर आणि एक घर असून त्याचे महिन्याचे उत्पन्न ५० हजार रुपये इतके आहे. श्रीराम यांचा चौथा मुलगा रामजीरामसिंग अयोध्या बायपासमधील एका खासगी महाविद्यालयात प्राध्यापक असून त्यांचा पगार दरमहा 30 हजार रुपये इतका आहे. पण तरी देखील यांच्या पैकी कोणीही वडिलांना आपल्या जवळ ठेवायला तयार नाही. वृद्ध श्रीराम यांना दर महिन्याला मिळाली पाहिजे ईतकी रक्कम. हृदयरोग आणि मधुमेह ग्रस्त असलेल्या श्रीराम यांना आपली आर्थिक स्थिती चालवण्यासाठी चौकीदार म्हणून काम करावे लागत आहे.

त्यांच्या देखभालीच्या पैशासाठी त्यांनी नुकताच शहरातील एसडीएम वंदना जैन यांना अर्ज केला आहे. या प्रकरणाची सुनावणी घेत एसडीएम जैन यांनी गुरुवारी त्यांच्या चारही मुलांना बोलावून श्रीराम यांना देखभालीच्या खर्चा साठी दरमहा एकूण दहा हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास त्यांच्या चारही मुलांना तुरुंगात पाठविण्याची कारवाई केली जाईल. आता त्यांना नको असल्यासही सर्व मुलांना आपल्या वडिलांचा त्यांचा हक्क द्यावा लागेल तसे न केल्यास तुरूंगात जाण्याची तयारी करावी लागेल.

मित्रानो आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.