मेष-१५ मार्च ते २१ मार्च
राशीतून भ्रमण करणारा शुक्र विवाहेच्छुकांचे विवाह घडवून आणेल. मनोरंजनात मन रमेल. गृहसौख्य, वाहनसौख्यांचा लाभ होईल. उत्साही व आंनदी राहाल. पती-पत्नीतील तणाव दूर होऊन समस्यांचे वातावरण सुखावह वाटेल. भागीदारीतील गैरसमज दूर करा. सहकारी व कुटुंबातील व्यक्तीबरोबर नरमतेचे धोरण ठेवा. गैरसमज निर्माण करणारा काळ आहे, तरी सावध राहा. प्रकृतीत सुधारणा दिसून येईल. प्रवास जपून करावा. कलावंतांना आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रास संभवतो. कोर्ट कचेरीतल्या कामामध्ये सफलता मिळेल. राजकीय क्षेत्रात अनुकूलता संभवते. सर्व कार्य अडचणीशिवाय सुलभतेने होईल . कामकाजानिमित्त बाहेर प्रवास करणे फायदेशीर ठरेल. नवीन नातेसंबधं लाभदायक होतील.
शुभ तारीख-१५,१८,१९,२०
वृषभ-१५मार्च ते २१मार्च
आपल्या आवाक्याचे भान ठेवूनच वागा. असे आठवड्याच्या सुरुवातीस ग्रहमानाने तुम्हाला सांगणे आहे. नाहक चिडचिड नुकसान करू शकते. मनाला पटत नाही ते टाळण्याचा प्रयत्न करा. गोड बोलून मार्गक्रम करावे लागेल.आठवड्याच्या सुरुवातीस आपणास आर्थिक विवंचना नसतील,हे नक्की. परंतु काही आप्तेष्टांच्या वागण्या -बोलण्याने तुम्ही थोडे त्रस्त व्हाल. ज्येष्ठांचे. मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. कलावंतांना आर्थिक आणि शारीरिक दृष्ट्या त्रास संभवतो. कोर्ट कचेरीतल्या कामांमध्ये सफलता मिळेल.
शुभ तारीख-१६,१८,२१
टीप- मित्रांनो आमच्या लेखमध्ये राशी भविष्याबद्दल दिली जाणारी माहीत कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत आणण्यासाठी आहे त्याचा आपण कुठलाही गैरसमज करून घेऊ नयेत आणि आपल्या राशीतील ग्रहांच्या आणि कुंडलीची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाला किंवा पंडितला विचारावे धन्यवाद.
ज्योतिषाचार्य -श्रीधर गोखले